एकाच गावातील पाच युवकांचा तलावात बुडून मृत्यू... गावात पसरली शोककळा

Foto
 शेतातील काम आटोपून घरी निघालेल्या पाच युवकांना तलावात पोहोण्याचा मोह जीवावर बेतला. पाण्याचा अंदाज न आल्याने एका पाठोपाठ पाच युवकांचा तलावात बुडून दुर्दैवी अंत झाला.ही घटना आज दुपारी चिकलठाणा जवळील नाथनगर तलावात घडली. पाच हि तरुण हे भाल गावातिल आहेत या घटनेमुळे संपूर्ण  गावात शोककळा पसरली आहे.
समीर शेख मुबारक शेख (वय 17 वर्ष ), शेख अन्सार शेख सत्तारा (वय 17 वर्ष )
,आतीक युसुफ शेख वय (18 वर्ष ),तालेब युसुफ  शेख (वय 21 वर्षे ),सोहेल युसुफ शेख वय 16 वर्षे(सर्व राहणार भालगाव)अशी तलावात बुडून मृत्यू पावलेल्या युवकांची नावे 


याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेश आंधळे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की हे पाचही तरुण भालगाव येथील असून ते वरझडी येथे शेतात फुलगोबी काढण्यासाठी गेले होते शेतातील काम आटोपल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचही तरुण घरी भालगाव कडे निघाले होते दरम्यान रस्त्यामध्ये नाथ नगर चा तलाव त्यांच्या नजरेस पडला आणि या तरुणांना तलावात पोहण्याचा मोह अनावर झाला पाचही जण तलावात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ एक असे पाचही तरुण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले व काही क्षणातच पाचही तरुण पाण्यात बुडाले ही माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी पोलिसांना देतात चिकलठाणा पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करीत सहाय्यक निरीक्षक आंधळे बीड जमादार रवींद्र साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन दल पोलीस यांनी गावकऱ्यांच्या मदतीने पाचही  युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे